नागपूर - पुणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रिंगरोडसह विविध रस्ते व मेट्रो प्रकल्पांची कामे सुरू आहेत. रिंगरोडच्या पूर्व भागाचे काम मे २०२८ पर्यंत आणि पश्चिमेकडील भागाचे काम मे २०२६ पर्यंत पूर्ण होईल..तसेच, हडपसर-लोणी काळभोर मेट्रो कॉरिडॉरच्या कामाची तांत्रिक व्यवहार्यता तपासून कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिली.सदस्य राहुल कुल यांनी पुणे रिंगरोड व इतर प्रकल्पासंदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते. या चर्चेत सदस्य सुनील शेळके, अभिजित पाटील यांनी सहभाग घेतला. भुसे म्हणाले, ‘पुण्याच्या ग्रामीण भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ‘एमएसआरडीसी’ व ‘एमएसआयडीसी’मार्फत रिंगरोड, इतर रस्ते विकसित करणे आणि हडपसर-लोणी काळभोर मेट्रो कॉरिडॉर या प्रमुख प्रकल्पांवर कामे सुरू आहेत..पुणे रिंगरोडसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांना वेग देण्यासाठी प्रशासनाने निर्णायक पावले उचलली आहेत. रिंगरोड पूर्वमधील १२ पैकी नऊ पॅकेजेसची कामे वेगाने सुरू असून उर्वरित तीन पॅकेजेस प्रशासकीय मान्यतेसाठी प्रक्रियेत आहेत. ही तिन्ही पॅकेजेस मे २०२६ पूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल.तसेच, ऑक्टोबर २०२६ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. रिंगरोड पश्चिममधील सर्व पाच पॅकेजेसची कामे प्रगतिपथावर असून, प्रकल्पाची पूर्णता मुदत पश्चिमेस मे २०२७, तर पूर्वेस मे २०२८ अशी निश्चित केली आहे.’’.रस्ते प्रकल्पांना वेगपुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या उन्नतीसाठी ‘एमएसआयडीसी’कडून जलद कामकाज सुरू आहे. हडपसर-यवत मार्ग प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. पुणे-शिरूर या सहा पदरी रस्त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून, निविदा स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे. शिरूर-छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड प्रकल्पाचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत मार्गाची निविदा प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती मंत्री भुसे यांनी दिली..‘एनए’साठी आवश्यक २५ एकर जमिनीची मर्यादा कमी करावी, तसेच गायरान जमिनींवरील घरांचा प्रश्न सोडवून विकास प्रक्रिया अधिक लोकाभिमुख करावी, अशी मागणी राहुल कुल यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात केली. कुल यांनी सन २०२५चे विधानसभा विधेयक क्रमांक ९४- महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यात प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत (सुधारणा) विधेयक, २०२५वर आपले मत मांडले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.