
Pune Ring Road
Sakal
पुणे : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) वर्ग करण्यात आलेल्या सोलापूर रस्ता ते पुणे-बंगळूरदरम्यानच्या सुमारे ३१ किलोमीटर लांबीच्या वर्तुळाकार रस्त्याच्या (रिंगरोड) कामासाठी फेरनिविदा काढण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे ‘रिंगरोड’चा खर्च काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.