

Pune Ring Road Project Gets Big Boost As State Approves 10502 Crore For 31805 Km Eastern Stretch And Land Acquisition
sakal
पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यात आलेल्या रिंग रोडमधील सोरतापवाडी (वळती) ते वरवे बुद्रुक (शिवरे) या पूर्वेकडील सुमारे ३२ किलोमीटर टप्प्यासाठी १० हजार ५०२ कोटी ३६ लाख रुपयांच्या खर्चास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली. त्यामुळे पुणे-सोलापूर रस्ता आणि पुणे-सातारा रस्ता यांना जोडणाऱ्या या टप्प्याचे भूसंपादन करून बांधकाम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.