
PMRDA Update
Sakal
पुणे : प्रस्तावित रिंगरोडसाठी सोलू ते निरगुडी यामधील तीन गावांची भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्या गावांतील शेतकऱ्यांना मोबदल्यापोटी एफएसआय (चटई क्षेत्र निर्देशांक) अथवा टीडीआर (हस्तांतर विकास हक्क) देण्याच्या अनुषंगाने तातडीने बैठका आयोजित कराव्यात, अशा सूचना पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी प्रशासनाला दिल्या.