मंडई : फळभाज्यांच्या भावात वाढ

कांदा, बटाटा व लसूण स्थिर; बाजारात ९० गाड्यांची आवक
mandai
mandaisakal

मार्केट यार्ड : गेल्या आठवड्याच्या तुलनेत रविवारी बाजारात फळभाज्यांची आवक घटली. कांदा, बटाटा आणि लसणाचे भाव स्थिर असून इतर फळभाज्यांच्या भावात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून ठिकठिकाणी सुरु असलेल्या पावसामुळे शेतीमाल काढण्यास अडचणी येत असल्याने आवक घटली होती. परिणामी भावात वाढ झाली. मार्केटयार्डात रविवारी ८० ते ९० गाड्यांची आवक झाल्याची माहिती अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.

परराज्यातून आलेल्या मालामध्ये मध्यप्रदेशातून ५ ते ६ टेंपो गाजर, गुजरात आणि कर्नाटकातून ५ टेंपो कोबी, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमधून ४ टेंपो शेवगा, गुजरात, कर्नाटकातून ८ टेंपो हिरवी मिरची, मध्यप्रदेश आणि गुजरातमधून ८ ट्रक लसूण, आग्रा, इंदौर, गुजरात आणि स्थानिक भागामधून बटाट्याची ४० ट्रक इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले ८०० गोणी, कोबी सुमारे ५ ते ६ टेंपेा, फ्लॉवर ८ टेंपो, भेंडी ५ ते ६ टेंपो, गवार ५ ते ६ टेंपो, सिमला मिरची १० ते १२ टेंपो, टोमॅटो ६ ते ७ हजार पेटी, तांबडा भोपळा ८ टेंपो, हिरवी मिरची ३ ते ४ टेंपो, पावटा ४ ते ५ टेंपो, पुरंदर, पारनेर, वाई आणि साताऱ्याहून मटार ५०० ते ६०० गोणी, भुईमूग शेंग १ हजार पोती आणि कांद्यांची ६० ते ६५ ट्रक इतकी आवक झाली.

कोथिंबिरीच्या सव्वालाख जुड्यांची आवक

पालेभाज्यांची मागणी आणि पुरवठा सम प्रमाणात असल्याने भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. कोथिंबिरीची सव्वालाख जुड्या, तर मेथीची ६० हजार जुड्यांची आवक झाली. घाऊक बाजारात कोथिंबिरीची जुडी ३ ते ६ रुपये, तर किरकोळ बाजारात १० ते १५ रुपयांना विक्री केली जात होती. तसेच मेथीची घाऊक बाजारात ४ ते ७ रुपये, तर किरकोळ बाजारात १० ते १२ रुपयांना विक्री केली जात असल्याची माहिती अडते असोसिएशनचे उपाध्यक्ष अमोल घुले यांनी दिली.

पालेभाज्यांचे घाऊक बाजारातील भाव (शेकडा जुडीचे) : कोथिंबीर ३०० -६००. मेथी ४००-७००. शेपू ३००- ४००. कांदापात ४००-६००. चाकवत ४००-५००. करडई ५००-७००. पुदीना १००-३००. अंबाडी ४००-५००. मुळे ६००-८००. राजगिरा ४००-५००. चुका ३००-५००. चवळई ५००-७००. पालक ४००-७०.

mandai
श्रावणामुळे चिकन, मटण, मासळीच्या मागणीमध्ये घट

कलिंगड, सीताफळ आणि पेरूची घसरण

कलिंगड, सीताफळ आणि पेरूच्या भावात रविवारी घट झाली. पपई आणि लिंबांचे भाव वाढले असून अननस, डाळिंब, संत्रा, मोसंबी, खरबूज आणि चिक्कूचे भाव स्थिर आहे. लिंबांच्या भावात गोणीमागे शंभर रुपयांनी वाढ झाली असून पपईच्या भावात किलोमागे दोन ते तीन रुपयांनी वाढ झाली, तर कलिंगडाच्या भावात किलोमागे आठ ते दहा रुपयांची घसरण झाली. सीताफळाचे भावही दहा ते वीस टक्क्यांनी घसरले असून पेरूच्या भावात वीस किलोच्या क्रेटमागे १०० ते १५० रुपयांची घट झाल्याची माहिती अडते असोसिएशनचे उपाध्यक्ष युवराज काची यांनी दिली.

mandai
स्वत:च्याच बंगल्यावर नार्वेकरांचा हातोडा

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) २००-४००. अननस (डझन) ७०-२७०. मोसंबी (३ डझन) १००- २२०, (४ डझन) ३० ते १००, संत्रा (१० किलो) १००-८००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा ३०-१३०, गणेश ५-२५, आरक्ता १०-५०. कलिंगड ८-१२. खरबूज २५-३०. पपई १५-२८. चिक्कू (१० किलो) १००-५००. पेरू (२० किलो) १५०-३००.

जुई, मोगऱ्याला मागणी

फूल बाजारात फुलांच्या आवकेमध्ये वाढ झाली. रक्षाबंधनमुळे जुई आणि मोगऱ्याच्या मागणीत दुप्पटीने वाढ झाली. मात्र भाव स्थिरच असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. दरम्यान, मंदिरे उघडल्यास फुलांच्या मागणी वाढ होण्याचा अंदाज बाजार अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी व्यक्त केला. फुलाचं भाव (किलोचे) : झेंडू २०-४०. गुलछडी ५०- १००. कापरी १०-३०. शेवंती ४०-१००. मोगरा २५०-३५०. ऑस्टर ८-१२. गुलाबगड्डी (बारा नगाचे दर) : २०-३०, डच गुलाब (२० नग) ६०-१३०. गुलछडी काडी २०-५०. लिलिबंडल (५० काडी) ८-११, जरबेरा ८०-१२०. कार्नेशियन १००-१५०.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com