

Pune municipal waste violation
sakal
पुणे : एकीकडे शहर स्वच्छतेच्या मोठ्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे पुणे महापालिकेच्या इमारतीच्या समोरच नदीपात्रात अनेक डंपर राडारोडा टाकला जात असताना प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नदीची सुरक्षा धोक्यात आली आहे. याप्रकरणावर महापालिका प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.