

Pune Tempo Accident Claims Life of 26 Year Old Woman Researcher From Khubi While Heading to Work
sakal
रेठरे बुद्रुक : खुबी येथील युवतीचा पुणे येथे काल (मंगळवार) दुपारी अपघाती मृत्यू झाला. श्रद्धा राजाराम माने (वय २६) असे तिचे नाव आहे. याबाबत नातेवाइकांनी सांगितले, की पुण्यातील निगडी येथून ती नोकरीच्या ठिकाणी जात असताना काही अंतरावरच तिच्या दुचाकीस पाठीमागून टेंपोने जोराची धडक दिली.