

Pune Accidents
Sakal
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातांत एका ज्येष्ठ नागरिकासह दोघांचा मृत्यू झाला. नगर रस्त्यावरील लोणीकंद भागात रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याचा भरधाव कारची धडक बसल्याने मृत्यू झाल्याची घटना २२ ऑक्टोबरला दुपारी चारच्या सुमारास घडली. तोयाबहाद्दूर किनबहाद्दूर थापा (वय ४८, सध्या रा. लोणीकंद) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. थापा हे हॉटेल कामगार आहेत. थापा चंद्रमा हॉटेलसमोर रस्ता ओलांडत असताना त्यांना भरधाव कारची धडक बसली. अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पसार झालेल्या मोटार कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक विजया वंजारी या गुन्ह्याचा तपास करत आहेत.