

Unnecessary Digging on Functioning Footpaths
Sakal
पुणे : एकाच रस्त्यावर अतिशय सुस्थितीत असलेला पादचारी मार्ग खोदण्यात आला आहेत, तर त्याच रस्त्यावर पुन्हा रस्ता खोदून सीसीटीव्हीची केबल टाकली आहे. काही ठिकाणी केबल टाकून १५ दिवस झाले तरी महापालिकेने रस्ता दुरुस्त केलेला नाही. महापालिका प्रशासन आणि पोलिसांच्या बघ्याच्या भूमिकेमुळे गृह विभागाचे ठेकेदारावर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. यामुळे पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहेच. महापालिकेचेही यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. महापालिका प्रशासनाचे डोळे उघडणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.