

While the Road Department claims Pune has 2,371.87 km of roads, the Solid Waste Department has estimated the network at 6,892 km for sanitation planning.
Sakal
पुणे : पुणे महापालिकेच्या पथ विभागाच्या नोंदीनुसार शहरात २ हजार ३७१ किलोमीटरचे रस्ते आहेत. पण घनकचरा विभागाने झाडणकामासाठी तब्बल ६ हजार ८९२ किलोमीटर लांबीचे रस्ते असल्याचे दाखवले आहे. या दोन्ही विभागांच्या आकड्यात तब्बल ४ हजार ५२१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा फरक दिसून येत असल्याने पुण्यात नेमकी रस्त्यांची लांबी किती किलोमीटरची असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे दोन्ही विभाग आपापल्या दाव्यावर ठाम आहेत.