Pune : अनधिकृत पार्किंग मुळे रस्ता अरुंद ; शंकर शेठ रस्त्याची स्थिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune : अनधिकृत पार्किंग मुळे रस्ता अरुंद ; शंकर शेठ रस्त्याची स्थिती

Pune : अनधिकृत पार्किंग मुळे रस्ता अरुंद ; शंकर शेठ रस्त्याची स्थिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे (महर्षी नगर) : स्वारगेट परिसरातील शंकर शेठ रस्त्यावर अनधिकृत पार्किंग मुळे रस्ता अरुंद झाला आहे, अरुंद रस्त्यामुळे नागरिकांना चालताना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. वेगा सेन्टर परिसर, पौर्णिमा टॉवर परिसरजवळ मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले असून पदपथावर अतिक्रमण केलेल्या अनधिकृत व्यवसायिक, अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. परिणामी वाहतूक कोंडीत भर पडते.

सायंकाळच्या सुमारास वाहतुकीच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. हडपसरकडून स्वारगेट कडे जाणाऱ्या वाहनांना कोंडीचा सामना करावा लागतो. या रस्त्यावरील वाहनांचा वेग पाहता मोठे अपघात होण्याची शक्यता आहे, शंकरशेठ रस्त्याला मोकळा श्वास घेण्याची नितांत आवश्यकता असून वाहतूक विभाग आणि अतिक्रमण विभागाने संयुक्तिक कारवाई करण्याची आवश्यक आहे.

हेही वाचा: वानखेडे कुटुंबियांविरोधातील नवाब मलिकांच्या आरोपांना लागणार ब्रेक!

"स्वारगेट वाहतूक विभागाकडून आवश्यक कारवाई नियमितपणे होत असते, परंतु अनेक महिने, वर्षे खितपत पडून असणाऱ्या वाहनांचा शोध घेऊन कारवाई सुरू केली आहे. वाढलेले अतिक्रमण हा महानगरपालिकेचा विषय आहे, रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल.''

- अरुण हजारे, स्वारगेट वाहतूक प्रमुख

"शंकरशेठ रस्ता हा दुर्लक्षित राहिला आहे, कारवाई योग्यरीत्या होत नसल्याने कोंडीत भर पडते. हडपसर मार्गे सोलापूर कडे जाणार हा मार्ग असल्याने कोंडी सोडवण्यासाठी योग्य पाऊल उचलावे, तसेच धोकादायक चेंबर्स हा विषय ऐरणीवर आला आहेत."

- सूर्यकांत होटकर, सामाजिक कार्यकर्ते

loading image
go to top