
Pune Roads CCTV Project
Sakal
पुणे : रस्त्यातील अडथळे, अतिक्रमण दूर करा, नोव्हेंबर अखेरपर्यंत खड्डेमुक्त करा, असा आदेश महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी प्रशासनाला दिला. पण त्याचवेळी दुसरीकडे पोलिसांतर्फे शहरातील तब्बल ५५० किलोमीटरचे रस्ते ‘सीसीटीव्ही’ची केबल टाकण्यासाठी खोदण्यात येणार आहे. याची सुरुवात नवी पेठेतील राजेंद्रनगरमधून झाली आहे. त्यामुळे पुणे खड्डे मुक्त कसे होणार? असा प्रश्न उपस्थित झाला असून, महापालिकाही संभ्रमित झाली आहे.