
"Pune Roads Dug Up Again: ₹300 Cr Wasted as Contractors Freed from Liability"
Sakal
पुणे : कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेल्या १०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर सेवा वाहिन्यांसाठी खोदाई करण्याची परवानगी महापालिकेच्या पथ विभागाने दिली. त्यामुळे संबंधित रस्ते दुरुस्त करण्यासाठी ठेकेदारावर असलेली दोषदायित्व (डिफेक्ट लायबिलिटी पीरियड- डीएलपी) जबाबदारी संपुष्टात आल्याने संबंधित रस्ते दुरुस्त करण्याचा आर्थिक बोजा महापालिकेच्या खांद्यावर आला आहे.