esakal | पुणे: रस्त्यांच्या नशिबी कमी दराच्या निविदा!
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे महानगरपालिका

पुणे: रस्त्यांच्या नशिबी कमी दराच्या निविदा!

sakal_logo
By
ब्रीजमोहन पाटील

पुणे: शहरातील रस्ते सुस्थितीत असावेत, नागरिकांच्या सोईसाठी थर्मोप्लास्टिक पेंट मारणे, साइनबोर्ड लावणे, कॅट आय बसविणे यासह इतर कामे करण्यासाठी आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, महापालिकेने या कामासाठी जी रक्कम निश्‍चीत केली होती, त्यापेक्षा २६ टक्के ते ३८ टक्क्यांपर्यंत कामे कमी दरानी आली आहेत. त्यामुळे नुसती निविदा मंजूर होणार की कामाचा दर्जाही राखणार असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा: Pune : शहराच्या बाजूने होणाऱ्या चक्राकार रिंगरोडला मान्यता

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात महापालिकेने शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रेनेज, समान पाणी पुरवठा आदी कामांमुळे खोदकाम झालेले आहे. हे रस्ते बुजविताना काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने हे रस्ते पुन्हा खचले आहेत. त्यात मॅनहोल चेंबर वर आले आहेत किंवा खाली गेले आहेत. रस्तावर लावलेले पॅराबॉलिक डिव्हायडर, कॅट्स आय खराब झालेले आहेत. अनेक ठिकाणचे बोलार्ड तुटलेले आहेत. १२ मीटर पेक्षा मोठ्या रस्त्याची कामे करण्यासाठी पथ विभागाने १५ क्षेत्रीय कार्यालयापैकी ८ कार्यालयांच्या निविदा अंतिम केल्या आहेत.

असा आहे प्रकार...

कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाच्या या कामासाठी ६६ लाख ७० हजारांचे पूर्वगणनपत्रक होते, पण निविदा ३२ टक्के कमीने येऊन ठेकेदार हे काम ४४ लाख ५५ हजारात करणार आहे. महापालिकेने कमी दराने निविदा येण्यात काही गैर नाही, पण ठेकेदराकडून चांगल्या दर्जाचे काम करून घेण्यासाठी पथ विभागाला चोखपणे बजवावी लागेल असे जाणकारांचे म्हणणे आहे.

असे आहे गणित...

क्षेत्रीय

कार्यालय पूर्वगणनपत्रक रक्कम निविदा मान्य रक्कम

(कमी दराची टक्केवारी)

कोथरूड ६६.७० लाख ४४. ५५ लाख (-३२.५६)

वारजे-कर्वेनगर ७४.९९ लाख ४२.८८ लाख (-३५.१०)

नगर रस्ता ७४.९८ लाख ४१.५९ लाख (-३६.९९)

कसबा-विश्रामबाग ७४.९९ लाख ४०.४४ लाख (-३८.८०)

बिबवेवाडी ६६.०२ लाख ४८.६८ लाख (-२६.२६)

भवानी पेठ ६६.०७ लाख ४४.२७ लाख (-३३)

सिंहगड रस्ता ६६.०२ लाख ४५.७८ लाख (-३०.३५)

येरवडा ६६.०७ लाख ४१.६३ लाख (-३६.९९)

loading image
go to top