esakal | Pune : शहराच्या बाजूने होणाऱ्या चक्राकार रिंगरोडला मान्यता
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : शहराच्या बाजूने होणाऱ्या चक्राकार रिंगरोडला मान्यता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लोणी काळभोर : पुणे शहराच्या औद्योगिक प्रगतीमुळे आणि वाढते नागरीकरण याचा विचार करता सध्या अस्तित्वात असलेले रस्त्यांचे जाळे अपुरे पडत आहे. त्यामुळे कोल्हापूर, सासवड, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, नांदगाव, कोकण, मुंबई या भागातून येणाऱ्या वाहनांना शहरातून जावे लागत आहे.

त्यामुळे अंतर्गत असणाऱ्या रस्त्यावर त्याचा ताण वाढू लागला आहे. त्यामुळे शहरात प्रदूषण वाढीस मदत होत आहे. त्यामुळे शहरातंर्गत रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असून विकासाला खीळ बसली आहे.

ही वाहने शहराच्या आत न आणता बाहेरच्या बाहेर योग्य दिशेने वळविण्याकरिता शहरा बाहेर चक्राकार मार्ग काढणे आवश्यक असल्याने पुणे शहराभोवती चक्राकार मार्ग काढण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे.

पुणे शहराचा विकास पाहता आणि वाढते नागरीकरण पाहता शिक्षण, आयटी, ऑटो इंडस्ट्री या क्षेत्रात पुणे शहराने देशात मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे पुणे शहराला तीन राष्ट्रीय महामार्ग छेदून जातात. त्यात मुंबइ- बंगलोर, मुंबई - हैद्राबाद- विजयवाडा, पुणे -नाशिक शिवाय पुणे - पंढरपूर, पुणे - औरंगाबाद, पुणे - माणगाव हे राष्ट्रीय महामार्ग पुण्याच्या बाजूने जातात. रिंगरोड नसल्याने सर्व राष्ट्रीय वाहतुक शहराच्या आतील भागातून जाते.

हेही वाचा: शिरूर: निर्वीत सापडला १४ फूट लांबीचा दस्तऐवज

याशिवाय वाहतूक, वाहन पार्किंग या समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावू लागल्या आहेत. त्यामुळे ही बाहेरून शहरात येणारी वाहतूक बाहेरून चक्राकार रिंगरोड करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने आता मंत्रिमंडळ सुविधा समितीच्या दि.२८ ऑगस्ट २०२१ रोजी झालेल्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले आहेत.

पूर्व रिंगरोड भाग सोलू (आळंदी- मरकळ रस्ता) ते सोरतापवाडी पुणे - सोलापूर रस्ता एकूण २९.८५ किमी, खर्च ३५२३.९३ कोटी ,रस्त्याच्या भूसंपादनासाठी १३३५ कोटी तसेच सेवा वाहिन्या हस्तांतरणासाठी ३० कोटी, बांधकाम कालावधीतील कामावरील व्याज १७६.८२ व व्यवहार्यता तफावत निधी ७५७.१८ कोटी अशी एकूण २३१९.०० कोटी रुपयांना मान्यता देण्यात येत आहे.

loading image
go to top