

Heavy Vehicle Driver Eyesight
Sakal
पुणे : ट्रक, कंटेनरसारख्या अवजड वाहनांची वाहतूक करणाऱ्या चालकांना दूरचे दिसत नाही. काहींना मोतिबिंदू, तर काहींच्या चष्म्याचा नंबर वाढलेला; अनेकांना तर चष्मा लागला आहे, हेच माहीत नाही. शनिवारी खेड शिवापूर टोल नाक्याजवळ वाहनचालकांच्या डोळ्यांची तपासणी केली. तेव्हा ६० पैकी २० चालकांना दृष्टिदोष आढळला. डोळ्यांमध्ये दोष असेल, तर प्रवास सुरक्षित कसा होणार? असा प्रश्न निर्माण होतो.