RTO News : पुण्यात ३० टक्के वाहनांना ‘उच्च सुरक्षा पाटी’, पाचव्यांदा मुदतवाढ; तरीही वाहनधारकांचा अल्प प्रतिसाद

Low Compliance for HSRP in Pune : राज्य परिवहन विभागाने ५ वेळा मुदतवाढ देऊनही पुणे आरटीओ अंतर्गत नोंद असलेल्या २४ लाखाहून अधिक वाहनांपैकी केवळ ३०% वाहनांनीच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवली असून, ३० नोव्हेंबरनंतर मुदतवाढ न मिळाल्यास दंड आकारला जाणार आहे.
Low Compliance for HSRP in Pune

Low Compliance for HSRP in Pune

Sakal

Updated on

पुणे : राज्य परिवहन विभागाने वाहनांना ‘उच्च सुरक्षा नोंदणी पाटी’ (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) बसविण्यासाठी आतापर्यंत ५ वेळा मुदतवाढ दिली. मात्र, तरीदेखील पुण्यातील केवळ ३० टक्के वाहनांनाच ही पाटी बसविण्यात आली आहे. ३० नोव्हेंबरपर्यंतच याची मुदत आहे. आता वाहनांना ‘उच्च सुरक्षा नोंदणी पाटी’ लावण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही, असे यापूर्वीच परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. ही नंबरप्लेट लावण्यासाठी पुणे आरटीओकडे नोंद असलेल्या २४ लाख २८ हजार ५८९ वाहनांपैकी केवळ ७ लाख २५ हजार ६७८ वाहनधारकांनीच आपल्या वाहनाला नंबरप्लेट बसविली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com