Pune News : पुण्यातील वाहतूक कोंडीला दिलासा: आरटीओ चौकातील रेल्वे भुयारी मार्गाचे रुंदीकरण
Pune RTO : आरटीओ चौक आणि मंगळवार पेठेतील शंभर वर्षांहून जुन्या आणि अरुंद रेल्वे भुयारी मार्गाचे रुंदीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, सल्लागार नियुक्त करून हा बोगदा किमान २० मीटर रुंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडी कायमची सुटण्याची आशा आहे.
पुणे : आरटीओ चौक आणि मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकादरम्यानच्या अरुंद रेल्वे भुयारी मार्गाचे रुंदीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या ठिकाणचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे.