
‘वारी विठुरायाची आणि आरोग्याच्या संगोपनाची’ हा ‘साथ चल’ उपक्रमाचा उद्देश आहे. त्याअंतर्गत नागरिकांना निरोगी आरोग्याची शपथ देण्यात येणार आहे.
Saath Chal : पुण्यात आज आरोग्यवारीचा ‘सकाळ’ आणि ‘फिनोलेक्स’तर्फे उपक्रम
पुणे - संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे औचित्य साधून ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्स केबल्स’तर्फे आयोजित ‘साथ चल’ उपक्रम शुक्रवारी (ता. २४) सकाळी साडेसहा वाजता कॅम्प परिसरातील महात्मा गांधी बसस्थानक (पूलगेट) होणार आहे. या उपक्रमाला विविध क्षेत्रांतील सामाजिक संघटनांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
‘वारी विठुरायाची आणि आरोग्याच्या संगोपनाची’ हा ‘साथ चल’ उपक्रमाचा उद्देश आहे. त्याअंतर्गत नागरिकांना निरोगी आरोग्याची शपथ देण्यात येणार आहे. याप्रसंगी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, ‘पीएमपीएमएल’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीकांत मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषप्रसाद, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड व अश्विनी कुलकर्णी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्था व संघटना, कला, संस्कृती, साहित्य, उद्योग-व्यापार, क्रीडा क्षेत्रांतील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्याला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालख्यांचे शुक्रवारी शहरातून प्रस्थान होत आहे. त्यानिमित्ताने पालखी मार्गावर पूलगेट येथील पीएमपीच्या महात्मा गांधी बसस्थानकावर सकाळी ६.३० वाजता ‘साथ चल’ उपक्रम होणार आहे.
Web Title: Pune Saath Chal Ashadhi Wari Sakal Media Group And Finolex Cables
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..