Pune : सदाशिव पेठेतील हॉटेलला आग, गंभीररित्या भाजलेल्या ६ वर्षीय मुलीचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune sadashiv peth hotel fire accident

Pune : सदाशिव पेठेतील हॉटेलला आग, गंभीररित्या भाजलेल्या ६ वर्षीय मुलीचा मृत्यू

पुणे : सदाशिव पेठेतील एका दुकानाला शनिवारी सकाळी 10.52 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या घटनेत गंभीररित्या भाजलेल्या 6 वर्षीय मुलीचा उपचारा मृत्यू झाला. दरम्यान, अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळविले आहे.

इकरा नईम खान ( वय 6 ) असे या घटनेत मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. सदाशिव पेठेतील स्काऊट ग्राउंड जवळील एक बिर्याणी हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये या शनिवारी सकाळी 10.40 वाजता आग लागल्याची घटना घडली. त्यानंतर हॉटेलमधील कामगारांनी अग्निशामक दलास याबाबत खबर दिली.

10.52 मिनिटांनी अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी हॉटेलच्या पोटमाळ्यावर कामगाराची मुलगी झोपली असल्याची माहिती जवानांना मिळाली. त्यामुळे जवानांनी तत्काळ मुलीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, गंभीर जखमी झालेल्या मुलीला जवानांनी बाहेर काढले, त्यानंतर देवदूत वाहनातून तिला तत्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र मुलगी गंभीर जखमी झाल्याने उपचारापूर्वीच मुलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांनी हॉटेलमधील 3 सिलेंडर बाहेर काढत आगीवर नियंत्रण मिळविले.