
Sadashiv Peth hostel fight among MPSC students in Pune (photo AI)
esakal
पुण्यातील सदाशिव पेठेतील एका होस्टेलसदृश फ्लॅटमध्ये राहणाऱ्या MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) परिक्षेची तयारी करणाऱ्या सहा तरुणींमध्ये चिकन बनवण्याच्या आणि भांडी धुण्याच्या क्षुल्लक वादातून गंभीर घटना घडली आहे. १४ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री या वादाने हिंसक वळण घेतले, ज्यामध्ये पाच विद्यार्थिनींनी त्यांच्या रूममेटवर हल्ला केला. या प्रकरणी खडक पोलिसांनी पाच आरोपी तरुणींवर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.