

Pune Crime
esakal
Pune Crime News: पुण्यातील सहकारनगर परिसरात बुधवारी (१० जून) रात्री १० वाजण्याच्या सुमारास एका तरुणावर चार अल्पवयीन मुलांनी गोळीबार केल्याची घटना घडली. या हल्ल्यात जिम मालक योगेश बनेकर या तरुणाला दोन गोळ्या लागल्या. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.