

Sahyadri Hospital Transplant Death Probe
Sakal
पुणे : सह्याद्री रुग्णालयातील यकृत प्रत्यारोपणानंतर कोमकर दांपत्याचा मृत्यू होऊन दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटला आहे. याबाबतची जबाबदारी निश्चित करण्याची जबाबदारी असलेल्या आरोग्य यंत्रणा (राज्य आरोग्य विभाग व ससून रुग्णालय) हे आपली जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलत आहेत. राज्य आरोग्य विभागाने याबाबतचा अंतिम अहवाल देण्याबाबत तो राज्य सल्लागार समितीकडे पाठवला आहे, तर ससून रुग्णालय प्रशासनाने त्यांच्याकडे यकृततज्ज्ञ उपलब्ध नसल्याचे कारण देत हे प्रकरण दुसऱ्या रुग्णालयाकडे पाठवावे, यासाठी हे प्रकरण पुन्हा डेक्कन पोलिस ठाण्याकडे पाठवले आहे.