

नामांकित कंपन्यांची वाहने एकाच ठिकाणी पाहण्याची व खरेदी करण्याची पर्वणी पुणेकरांना उपलब्ध झाली आहे. त्यासाठीच्या ‘सकाळ ऑटो एक्स्पो’चे शनिवारी (ता. १४) उद्घाटन होणार आहे.
पुणे - नामांकित कंपन्यांची वाहने एकाच ठिकाणी पाहण्याची व खरेदी करण्याची पर्वणी पुणेकरांना उपलब्ध झाली आहे. त्यासाठीच्या ‘सकाळ ऑटो एक्स्पो’चे शनिवारी (ता. १४) उद्घाटन होणार आहे.
‘सकाळ माध्यम समूहा’ने शनिवार (ता. १४) व रविवारी (ता. १५) या भव्य एक्स्पोचे आयोजन केला आहे. डीपी रस्त्यावर असलेल्या पंडित फार्म्समध्ये हा एक्स्पो होणार आहे. सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत तो सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.
कार किंवा दुचाकी खरेदी करण्याचा निर्णय झाल्यानंतर विविध ठिकाणच्या शोरूमला भेटी द्यायच्या, विविध कंपन्यांच्या गाड्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती घ्यायची, त्यांची तुलना करायची, बजेट लक्षात घ्यायचे, अशा हजारो प्रश्नांची उत्तरे शोधत फिरावे लागते. पण, या साऱ्या प्रश्नांची उत्तरे एकाच छताखाली मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने गाडी घेण्याचे स्वप्न वास्तवात उतरेल. एक्स्पोमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचेही अनेक पर्याय पाहायला मिळतील.
एक्स्पोबाबत
कुठे - पंडित फार्म्स, डीपी रोड, कर्वेनगर
कधी - १४ आणि १५ जानेवारी २०२३
वेळ - सकाळी ११ ते रात्री ८
प्रवेश व पार्किंग मोफत
स्टॉल आणि इतर माहितीसाठी संपर्क - ९३२५१०६६२६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.