सकाळ नाट्य महोत्सव : 'सकाळचा पुरस्कार म्हणजे पुण्याचा पुरस्कार'; डॉ. मोहन आगाशे यांची भावना

सकाळचा पुरस्कार मिळणं, हा पुण्यात शेवटचा शब्द समजला जातो. कारण सकाळ म्हणजे पुणे आणि पुणे म्हणजे सकाळ, असे अद्वैत आहे.
Dr. Mohan Agashe
Dr. Mohan Agashesakal

पुणे - सकाळचा पुरस्कार मिळणं, हा पुण्यात शेवटचा शब्द समजला जातो. कारण सकाळ म्हणजे पुणे आणि पुणे म्हणजे सकाळ, असे अद्वैत आहे. त्यामुळे सकाळचा पुरस्कार म्हणजे पुण्याचा पुरस्कार आहे, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी गुरुवारी (ता. १८) व्यक्त केली.

‘सकाळ नाट्य महोत्सवा'चे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी रंगभूमीवरील अतुलनीय योगदानासाठी डॉ. आगाशे यांना मुनगंटीवार यांच्या हस्ते ‘सकाळ जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या पुरस्काराला उत्तर देताना डॉ. आगाशे बोलत होते. रसिकांनी मला दिलेले प्रेम असेच अबाधित राहो आणि माझ्या हातून अधिक चांगले कार्य घडो, असेही ते म्हणाले.

Dr. Mohan Agashe
Pune Theft : ‘माझी आई गावी गेली आहे. मला भूक लागली असून, जेवण द्या’, असे म्हणत चोरटयांनी...

उद्घाटन सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांचाही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर, 'वरद प्रॉपर्टी सोल्युशन्स प्रा. लि.’चे संचालक महेश कुंटे, ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.’चे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव, 'सकाळ'चे मुख्य विपणन अधिकारी नवल तोष्णीवाल, सहयोगी संपादक अंकित काणे उपस्थित होते.

उद्‍घाटन आणि पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर ‘सारखं काहीतरी होतंय’ या नाटकाच्या प्रयोगाने महोत्सवाचा शुभारंभ झाला. सोमवारपर्यंत (ता. २२) बालगंधर्व रंगमंदिर येथे दररोज रात्री ९.३० वाजता हा नाट्य महोत्सव रंगणार आहे.

Dr. Mohan Agashe
Devendra Fadnavis : उसने बळ आणून वाघ होता येत नाही

'आमच्याकडे कोहिनूरपेक्षा मौल्यवान माणसे'

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, "राजकीय क्षेत्रात पीएम, सीएम अशी पदे असतात. पण आज येथे प्रशांत दामले यांचा 'पी' आणि डॉ. मोहन आगाशे यांचा 'एम', असे खऱ्या अर्थाने पीएम (पंतप्रधान) दर्जाचे व्यक्ती उपस्थित आहेत. व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठाच्या युगात नाट्यसंस्कृती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याबद्दल सकाळचे देखील अभिनंदन.

इंग्रज कोहिनूर हिरा घेऊन गेले, असे लहानपणी शिक्षक सांगायचे त्यावेळी खूप वाईट वाटत असे. पण प्रशांत दामले आणि डॉ. मोहन आगाशे यांसारख्या व्यक्तींकडे पाहिल्यावर आपल्याकडे कोहिनूर हिऱ्यापेक्षा मौल्यवान माणसे आहेत, याची खात्री पटते."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com