

Sakal's 'Suhana Swasthyam' Festival Returns
Sakal
पुणे : संतुलित जीवनाचा मार्ग दाखविणारा सर्वांगीण आरोग्याचा भव्य महोत्सव म्हणजे ‘सुहाना स्वास्थ्यम्’! ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे समाजाच्या समग्र कल्याणाच्या उद्देशातून आयोजित या आगळ्यावेगळ्या महोत्सवाचे यंदा चौथे वर्ष आहे. या वर्षी हा महोत्सव अधिक व्यापक झाला असून, ५ ते ७ डिसेंबर दरम्यान पुण्यात विविध ठिकाणी हा महोत्सव होणार आहे.