

Expert Talk on Financial Fraud Prevention
Sakal
पुणे : आर्थिक व्यवहार अधिकाधिक डिजिटल होत असतानाच्या काळात आर्थिक फसवणूक टाळणे हे आजघडीला सर्वात मोठे आव्हान आहे. त्यासाठी भारतातील आर्थिक फसवणुकीचे प्रकार समजावून घेत त्यापासून स्वतःचे संरक्षण करण्याचे उपाय पर्सनल फायनान्स क्षेत्रातील तज्ज्ञ चंद्रलेखा एम. आर. यांच्याकडून जाणून घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.