Pune : अखेर आज दुपारी आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सणस ग्राउंड खुले

पुणे शहरातील खेळाडूंना सरावासाठी म्हणून महापालिकेने सुमारे ५ कोटी रुपये खर्च करून सणस ग्राउंड येथे सिंथेटिक ट्रॅक तयार केला आहे.
Protest
Protestsakal

Pune - पुणे महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून सणस ग्राउंड येथे जिम्नॅस्टिक खेळाडूंसाठी सिंथेटिक ट्रॅकसह इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, त्याची देखभाल कशी करायची? कोणी करायची? ट्रॅक खराब झाला तर जबाबदारी कोणाची याचा प्रशासकीय गोंधळामुळे खेळाडूंना येथे खेळता येत नव्हते. अखेर आज दुपारी खेळाडू व पालकांनी आंदोलनाचा इशारा देताच महापालिकेने हे मैदान खुले केले आहे.

Protest
Pune : अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशास अर्ज करण्यासाठी शुक्रवारपर्यंत मुदतवाढ

पुणे शहरातील खेळाडूंना सरावासाठी म्हणून महापालिकेने सुमारे ५ कोटी रुपये खर्च करून सणस ग्राउंड येथे सिंथेटिक ट्रॅक तयार केला आहे. या मैदानात धावण्यासह इतर खेळाची सुविधा आहे. पण या मैदानाची देखभाल दुरुस्ती करणे महापालिकेसाठी डोकेदुखी ठरत आहे. काही महिन्यांपूर्वी या ट्रॅकवर थेट पीएमपीच्या बसेस उभ्या करून त्यांचे लोकार्पणाचा कार्यक्रम केल्याचा धक्कादायक प्रकारही घडला होता.

Protest
Mumbai News : संक्रमण शिबिरांऐवजी भाड्याच्या घरांना प्रकल्पग्रस्तांची पसंती

सणस ग्राउंडवर खेळाडूंना नियमीत सराव करता यावा यासाठी मैदान खुले करावे अशी मागमी केल्या काही महिन्यांपासून केली जात होती. पण प्रशासनाकडून त्यासंदर्भात निर्णय घेतला जात नव्हता. त्यामुळे याविरोधात आज दुपारी सणस ग्राउंड येथे आंदोलन करण्याचा इशारा खेळाडू व पालकांनी दिला होता.

त्यास भाजपनेही पाठिंबा देत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन गेट खुले करण्याची मागणी केली. आम आदमी पक्षानेही खेळाडूंसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्याची दखल घेत आज दुपारी प्रशासनाने हे मैदान खेळाडूंसाठी खुले केले आहे.

Protest
Pune : आठ बारामतीकरांनी आयर्नमॅन किताबाला घातली गवसणी

‘‘सणस ग्राउंड येथील सिंथेटिक ट्रॅकची काळजी घेणे आवश्‍यक आहे. त्यासाठी निविदा काढून संस्था नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तो पर्यंत महापालिकेचे सुरक्षा रक्षक नियुक्त करून हे ग्राउंड खेळाडूंसाठी खुले केले आहे.’’

विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com