Pune : अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना ‘सारथी’तर्फे अर्थसाहाय्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sarthi

Pune : अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना ‘सारथी’तर्फे अर्थसाहाय्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी ‘सारथी’तर्फे अर्थसाहाय्य देण्याच्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीला राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. तसेच, ‘सारथी’ संस्थेने विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यास सुरवात केली आहे.

‘सारथी’ संस्थेच्या माध्यमातून मराठा व कुणबी मराठा प्रवर्गातील राज्य सेवा पूर्व परीक्षा- २०२० उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी एकरकमी १५ हजार रुपयांच्या अर्थसहाय्यासाठी (स्पॉन्सरशिप) ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांबाबत ही प्रक्रिया होत नसल्याने विद्यार्थ्यांनी खासदार डॉ. कोल्हे यांची भेट घेऊन या विद्यार्थ्यांनाही ‘सारथी’कडून अर्थसाहाय्य मिळावे अशी मागणी केली होती.

हेही वाचा: पुणे आणि परिसरात विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात

डॉ. कोल्हे यांनी या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी 'सारथी'कडून अर्थसाहाय्य देण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत एकरकमी १५ हजार रुपये अर्थसहाय्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्याची प्रक्रिया 'सारथी'ने सुरू केली आहे. त्यासाठी २२ नोव्हेंबर ही अंतिम तारीख असून, अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० उत्तीर्ण झालेल्या मराठा व कुणबी मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी https://forms.gle/iFYwujXB2Fz9qKZH7 या लिंकवर तत्काळ अर्ज करावेत, असे आवाहन खासदार डॉ. कोल्हे यांनी केले आहे.

loading image
go to top