Pune : विवाहानंतर हि जिद्दीने अभ्यास करत सारिका हिंगे यांनी स्पर्धा परीक्षेत मिळवलेले यश प्रेरणादायी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सारिका हिंगे

Pune : विवाहानंतर हि जिद्दीने अभ्यास करत सारिका हिंगे यांनी स्पर्धा परीक्षेत मिळवलेले यश प्रेरणादायी

पारगाव :अवसरी बुद्रुक ता.आंबेगाव येथील सारिका अभिजित हिंगे -कारले यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत राज्य कर निरीक्षक व सहाय्यक कक्ष अधिकारी या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून एकाच वर्षात दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने त्याची राज्य कर निरीक्षक तसेच मंत्रालयातील सहाय्यक कक्ष अधिकारी पदासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे परिसरात कौतुक होत आहे.विशेष म्हणजे सारिका हिंगे यांनी विवाहानंतर हि जिद्दीने अभ्यास करत मिळवलेले हे यश तरूणींसाठी निच्छित प्रेरणादायी आहे.

सारिका हिंगे यांचे माहेर खेड तालुक्यातील चांदूस कोरेगावचे त्यांचे वडील काळुराम कारले नोकरी निमित्ताने मुंबईत असल्याने सारिका हिंगेयांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मुंबई शहरात झाले झुनझुनवाला कॉलेजमधून त्यांनी विज्ञान शाखेची पदवी संपादन केली आहे २०१३ साली त्यांचा अवसरी बुद्रुक येथील अभिजित आनंदराव हिंगे यांच्या बरोबर विवाह झाला त्यांना आठ वर्षाचा मुलगा आहे. संसारची तसेच मुलाच्या संगोपनाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत त्यांनी जिद्दीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरु ठेवला यावर्षी झालेल्या राज्य कर निरीक्षक व सहाय्यक कक्ष अधिकारी या दोन्ही परीक्षेत त्यांनी घवघवीत यश संपादन केले

असून एकाच वर्षात दोन्ही परीक्षा ऊतीर्ण झाल्या आहेत.सारिका हिंगे यांना मिळालेल्या यशाबद्दल त्या म्हणाल्या विवाह झाल्यानंतर सासरी आल्यावर कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना पती,सासरे, सासूबाई तसेच माझे दीर आशुतोष कांताराम हिंगे यांच्या प्रोत्साहनामुळे मी जिद्दीने अभ्यास सुरु ठेवला त्यामुळेच मी यश संपादन करू शकले. मी आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरु केली असून त्यामध्ये मी निच्छित यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सारिका हिंगे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल अवसरी बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक विष्णू काका हिंगे पाटील , शरद बँकेचे माजी संचालक संजय चव्हाण , उपसरपंच शितल हिंगे, सहकारी सोसायटीचे संचालक आशुतोष हिंगे यांनी अभिनंदन केले आहे.