

Sassoon Hospital pune
esakal
पुण्यातील भाजपचे शहर सरचिटणीस तथा माजी नगरसेवक पुष्कर तुळजापूरकर यांच्या सासरे प्रकाश पुरोहित हे गेल्या दोन महिन्यांपासून ससून जनरल रुग्णालयातून अचानक बेपत्ता झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. सप्टेंबर महिन्यात गंभीर आजाराने त्रस्त असलेले ७५ वर्षीय प्रकाश पुरोहित यांना उपचारासाठी ससूनमध्ये दाखल करण्यात आले होते; पण त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने कुटुंबीयांना त्यांच्या प्रकृतीची किंवा ठावठिकाणाची कोणतीही माहिती दिली नाही, असा दावा तुळजापूरकर यांनी केला.