

CAPD Maharashtra's First in a Govt Hospital
Sakal
पुणे : ‘ती’ ३४ वर्षांची तीन मुलांची आई. गर्भावस्थेदरम्यान वाढलेल्या रक्तदाबाकडे दुर्लक्ष झाले आणि त्याची किमत त्यांना दोन्ही मूत्रपिंडे निकामी होऊन मोजावी लागली. दोन वर्षांपासून डायलिसिसवर असलेल्या या महिलेच्या रक्तवाहिन्याही काम करेनाशा झाल्या. पण, ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्यासाठी नवा जीवनमार्ग शोधला. ‘कंटिन्युअस ॲम्ब्युलेटरी पेरिटोनियल डायलिसिस’ (सीएपीडी) या आधुनिक पद्धतीचा यशस्वी प्रयोग करून त्यांना नवजीवन दिले. आता त्या घरीच स्वतःचे डायलिसिस करीत आहेत. महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथमच असे उपचार झाले आहे.