

Sassoon Hospital
Sakal
पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयाच्या नवजात अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) करण्यात आलेले एक महत्त्वपूर्ण संशोधनआता थेट जागतिक वैद्यकीय इतिहासात प्रथमच नोंदवले गेले आहे. येथील बालरोग विभागाने नवजात बाळातील तात्पुरत्या मधुमेहाचे जनुक (ट्रान्झियंट निओनेटल डायबेटीस मेलिटस) हे आई -वडिलांकडून त्याच्यामध्ये आल्याचे सिद्ध केले आहे. अत्यंत दुर्मिळ आजाराशी संबंधित एका नवीन जनुकीय उत्परिवर्तनाचा जगातील पहिला नोंदवलेला दुवा ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी शोधून काढला आहे. हे संशोधन 'क्युअर' या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहे.