

Sassoon Hospital's Unidentified Patient Tragedy
Sakal
पुणे : ससून रुग्णालयात उपचारासाठी भरती केलेल्या प्रकाश पुरोहित (वय ६०, रा. कर्वेनगर) यांचा मृत्यू ससून रुग्णालयामध्येच यावर्षी ७ मार्च रोजी झाल्याचे समोर आले आहे. मात्र, त्यावेळी त्यांची नोंद बेवारस रुग्ण अशी झाल्याने नातेवाइकांना याबाबत कळवले गेले नव्हते. त्यांचा अंत्यविधी महापालिकेने बेवारस समजून केला.