Pune-Satana Bus Accident: पुणे-सटाणा बसने तीन तरुणांना चिरडले, अपघातानंतर चालक पळून गेला, तिघेही मजुरी करणारे मित्र

Three Friends Killed in Pune-Satana Bus Accident: देवळा तालुक्यात पुणे-सटाणा बसने दुचाकीला मागून धडक दिल्याने तिघा तरुणांचा मृत्यू झाला. तिघेही मजुरी करणारे मित्र असून, अपघातानंतर बसचालक घटनास्थळी न थांबता निघून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
Pune-Satana Bus Accident

Pune-Satana Bus Accident

esakal

Updated on

देवळा: येथील विंचूर-प्रकाशा राष्ट्रीय महामार्गावर रामेश्वर फाट्यावरील गायत्री नर्सरीजवळ गुरुवारी (ता. १३) रात्री दहाच्या सुमारास पुणे-सटाणा बसने दुचाकीने जाणाऱ्या तिघांना मागून जोरदार धडक देत चिरडल्याने तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर बसचालक न थांबता पळून गेल्याने संताप व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com