सलग दुसऱ्या दिवशीही पुणे-सातारा रस्त्यावर कोंडी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 सप्टेंबर 2019

पुणे-सातारा रस्त्यावर रविवारी सलग दुसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडी कायम आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या नागरीकांना कात्रज बोगद्यापासून ते सारोळ्यापर्यंत ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करत जावे लागत आहे.

खेड-शिवापूर : पुणे-सातारा रस्त्यावर रविवारी सलग दुसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडी कायम आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या नागरीकांना कात्रज बोगद्यापासून ते सारोळ्यापर्यंत ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करत जावे लागत आहे.

शनिवार (ता. 31) पासून पुणे-सातारा रस्त्यामार्गे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरीकांची संख्या जास्त आहे. मात्र या नागरीकांना पुणे-सातारा रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे शनिवारी सकाळपासून रात्री उशीरापर्यंत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता.

दरम्यान, तीच परिस्थिती रविवारीही कायम आहे. रविवारी सकाळपासूनच शिंदेवाडी येथून वाहतूक कोंडीला सुरुवात झाली आहे. वेळु फाटा, खेड-शिवापूर टोल नाका, वरवे फाटा, चेलाडी याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे. या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त झाले असून, प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यातच या रस्त्यावरील बेशिस्त वडाफ चालक बेशिस्तपणे पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेही वाहतूक कोंडीत भर पडत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune-satara expressway smooth traffic near khed shivapur