Pune Satara Highway: अखेर प्रशासनाला आली जाग; खंबाटकी बोगद्यातील धोकादायक खांब हटवले

याची दखल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तत्काळ घेत, घटनेचे गांभीर्य पाहता, हे धोकादायक खांब काढण्यासाठी यंत्रणा राबवुन हे खांब हटविण्याची सुरुवात केली
Pune Satara Highway
Pune Satara HighwaySakal
Updated on

खंडाळा - सातारा - पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटात असणाऱ्या बोगद्यातील लोखंडी खांब कार वर आदळले. तर यापुर्वी ही परवा बुधवारी टेंपोवर हे लोखंडी खांब पडले होते . याबाबत दै. सकाळ ने तत्काळ बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या.

याची दखल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तत्काळ घेत, घटनेचे गांभीर्य पाहता, हे धोकादायक खांब काढण्यासाठी यंत्रणा राबवुन हे खांब हटविण्याची सुरुवात केली आहे .

Pune Satara Highway
Satara Crime : प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पवारांचा काढला काटा; गळा आवळून, हात-पाय बांधून मृतदेह फेकला कालव्‍यात

या साठी मोठे दोन क्रेन, तसेच इतर यंत्रणा बोगदयात लावण्यात आली असुन, महामार्ग पोलीस सह खंडाळा पोलीस,सातारा पोलीस व वाई पोलीस यांचे पथक जागोजागी पाठविण्यात आले आहे . साताराहुन पुण्याला जाणारी वहातुक ही खंबाटकी घाटामार्गे वळविण्यात आली आहे . तर जड वहातुक थांबवुन ठेवण्यात आली आहे.

Pune Satara Highway
Delhi-Pune Flight: दिल्ली-पुणे विस्तारा विमान बॉम्बने उडवण्याची धमकी

वेळे (ता. वाई ) पासुन ही वहातुक घाटमार्गे वळविण्यात आली आहे . हे काम ३.३० ला सुरु झाले असुन पुढे दोन तास हे काम सुरु राहणार असल्याने वाहतचालकांनी दरम्यानच्या काळात सहकार्य करावे व प्रवाशांनी याची दखल घेऊनच प्रवास करावा असे आवाहान वाई उपविभागीय अधिकारी यांनी केले आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com