

Pune Satara Road Blocked After Truck Overturns Vehicles Stuck for Hours
Esakal
पुणे सातारा मार्गावर खंबाटकी घाटाच्या पायथ्याला ट्रक उलटल्यानं वाहतूक कोंडी झाली आहे. घाटाच्या खाली खंडाळा ते केसर्डी पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सकाळी साडे सात वाजल्यापासून खंडाळा घाटातून वाहतूक संथ गतीने सुरू आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं वाहनांची संख्या वाढलीय. त्यातच झालेल्या अपघातामुळे वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झालीय.