Pune News : शाळेच्या बसची भीषण धडक; पाच वर्षीय साईनाथचा मृत्यू; बसचालक आणि मोडक इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापकांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल!

Pune School Bus Accident : उरुळी देवाची येथे शाळेच्या बसच्या धडकेत ५ वर्षीय साईनाथचा मृत्यू झाला असून त्याची आई गंभीर जखमी आहे. संतप्त नातेवाइकांच्या आंदोलनानंतर बसचालकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune school bus accident leads to 5-year-old child's death; FIR filed against driver and school authorities.

Pune school bus accident leads to 5-year-old child's death; FIR filed against driver and school authorities.

Sakal

Updated on

फुरसुंगी : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसच्या धडकेत पाच वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची आई गंभीर जखमी झाली. ही घटना हडपसर-सासवड रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात घडली. या प्रकरणी बसचालक आणि मोडक इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापकांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साईनाथ तुळशीराम भंगारे (वय ५, रा. गणराज हाईट, उरुळी देवाची) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. त्याची आई रेखा तुळशीराम भंगारे (वय २८) गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी रेखा भंगारे यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com