कात्रज - वाहतूक पोलिसांकडून शालेय बसचालकांवर होणाऱ्या ई-चलन कारवाईला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातील शालेय बसमालकांनी दोन जुलैपासून बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. या संपाला पुण्यातील बसमालक संघटनांनी पाठिंबा दिला आहे..शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसेस, कंपनी कामगार बस, पॅकेज टूरसाठी चालणाऱ्या गाड्यांचे मालक संघटना या संपात सहभागी होणार असल्याचे पुणे बस अँड कार्स असोशिएशनचे सचिव तुषार जगताप यांनी सांगितले..ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस तसेच वाहतूकदार बचाव समिती यांच्यामार्फत बुधवारपासून (ता. २) स्वच्छेने बंदला पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारपासून प्रवाशांची वाहतूक करण्यात येणार नाही. बंदला पुणे बस अँड कार्स ओनर्स असोसिएशनने संपूर्ण पाठिंबा दिला आहे..मात्र, शाळेच्या किंवा संघटनेव्यतिरिक्त बसेस, रिक्षा यांना कोणतीही अडचण नसल्याचे संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. पुणे रिक्षा फेडरेशनचे बापू भावे यांनी आम्ही या संपात सहभागी होणार नसून आमची वाहतूक सुरळित चालू राहणार असल्याचे सांगितल्याने काही प्रमाणात प्रवाशी आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे..प्रतिक्रियाशाळेच्या किंवा कोणत्याही संघटनेबाहेरच्या बसेसना आमचा अटकाव नाही किंवा कोणतेही आंदोलनही आम्ही करणार नाहीत. केवळ बसेस बंद ठेवून पाठिंबा देण्यात येणार आहे.- किरण देसाई, कार्याध्यक्ष, पुणे बस अँड कार्स असोशिएशनएका संघटनेने संपाला पाठिंबा असल्याबाबत कळविले आहे. त्यासोबत त्यांनी इतरही काही अडचणी मांडल्या आहेत. त्यासाठी शासनाकडे आम्ही पाठपुरावा करु. मात्र, उद्यापासूनच बससेवा बंद करणार असल्याचे कळविण्यात आलेले नाही.- अर्चना गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे विभाग.दृष्टिक्षेपातपुणे शहरात एकूण बसेसची संख्या - अंदाजे १५ हजारस्कूल बसची संख्या अंदाजे - ५ ते ६ हजारकंपनी कामगार बसेसची संख्या- ५ ते ६ हजारटुरिस्ट पॅकेज बसची संख्या - २ ते ३ हजार.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.