Crime News : शाळेतील पुर्व वैमनस्यातून लोखंडी हत्याराने हाणामारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune school crime news Animosity in school led to fight with iron weapon

Crime News : शाळेतील पुर्व वैमनस्यातून लोखंडी हत्याराने हाणामारी

बालेवाडी : बाणेर येथील गणराज चौक येथे (ता. 16 जाने) रोजी रात्री 10 च्या आसपास चार दुचाकी वरुन हातात लोखंडी हत्यारे, सिमेंटच्या मोठया विटा, बांबू, कोयते, दांडूच्या सहाय्याने जोरदार हाणामारी होऊन रतन सुग्रीव माने (वय 20 वर्ष)हा गंभीर जखमी झाला असून, ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणात दोघांना कलम 307 अंतर्गत चतुशृंगी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. बाणेर येथे गणराज चौक या ठिकाणी (ता.16) रोजी रात्री 10 च्या दरम्यान पाच सहा जनामध्ये लोकांडी हत्यार, विटा, बांबू, लाकडी दांडक्याच्या सहाय्याने जोरदार हाणामारी झाली.

यामध्ये रतन सुग्रीव माने (वय 20) ,हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर कन्हैया पवार किरकोळ जखमी झाला आहे. या प्रकरणातइतर पाच सहा जणांचा समावेश असुन दोघांना चतुशृंगी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. तर कन्हैया पवार (वय -वर्ष ,18) , रहाणार गणराज चौक, बाणेर यास अटक करण्यात आली आहे. तर या घटनेतील इतरांचा शोध अजुन सुरु आहे.

या प्रकरणात जखमी रतन सुग्रीव माने व इतर सर्व जण राहणार संभाजी चौक, पाषाण, पुणे येथील रहिवासी आहेत. तर कन्हैया पवार हा सध्या बाणेर गणराज चौक येथे राहतो. हे सर्वजण पुर्वी चतुशृगी जवळील एकाच शाळेत शिकत असताना एकमेकांना चिडवायचे, तो राग मनात ठेऊन माने याने कन्हैया पवारला गणराज चौक येथे पाहून त्याच्यात बाचाबाची सुरु होऊन बरोबर असलेल्या साथीदारांसमवेत जबर मारहाण झाली.

हे सर्व जण नववी नापास असुन जखमी माने याचं भागातील एका सर्व्हिस सेंटवर काम करतो. तर बाकीचे मिळेल ते काम करतात. या वेळी तीन दुचाकी घटना स्थळी आढलून आल्या असून माने याच्या दुचाकीचे बरेच नुकसान झाले आहे. या प्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे व गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अंकुश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे व त्याचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.