
नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आजपासून होत असून शाळेचा आजचा पहिला दिवस आहे. शाळेत पहिल्यांदा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह नव्या वर्गात जाण्यासाठी विद्यार्थी उत्सुक आहेत. तर शाळांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. दरम्यान, पुण्यात एक प्राथमिक शाळा अचानक बंद करण्यात आल्याचं समोर आलंय. यामुळे विद्यार्थी आणि पालकांना पहिल्याच दिवशी शाळेच्या गेटवर ताटकळत उभा रहावं लागलं.