पुण्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार

चार ऑक्टोबरपासून इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे.
school
schoolsakal

पुणे : पुणे महापालिकेने चार ऑक्टोबरपासून इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. याबाबत आज आदेश काढण्यात आलेले आहेत.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार निर्बंध कमी करण्यात आलेले आहेत. बाजारपेठा, खाजगी कार्यालय, उद्योग, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू झालेले आहेत. मात्र शासनाकडून शाळे संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता. राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाची स्थिती सामान्य झालेली आहे त्यामुळे थेट शाळा सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली जात होती. त्यानुसार शासनाने आदेश काढला होते.

school
खळबळजनक! 'शिवसेना नेत्यानेच परबांविरोधातील माहिती सोमय्यांना पुरविली?'

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून रोजची कोरोना रुग्णांची संख्या 200 पेक्षा कमी आहे. शासनाने २४ सप्टेंबर रोजी आदेश काढले असले तरी महापालिका प्रशासनाने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नव्हता, त्यामुळे संभ्रम निर्माण झाली होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल शुक्रवारी बैठक घेऊन आढावा घेतला त्याच्यानंतर आज महापालिकेने चार ऑक्टोबर पासून शाळा सुरू करण्याचे आदेश काढले आहेत.

इयत्ता पाचवी ते बारावी चे वर्ग सुरू करावेत शिक्षकांची शाळा सुरू होण्याच्या पूर्वी य 48 तास आधी आरटीपीसीआर चाचणी होणे आवश्यक आहे. दर पंधरा दिवसांनी ही चाचणी केली जावी, शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांचे लसीकरण पूर्ण केले जावे, दिवसातून दोन वेळा शाळा निर्जंतुकीकरण करावी, शाळेत सोशल डिस्टंसिंग चे पालन होईल यादृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे अशा अटी महापालिकेने आदेशामध्ये टाकलेले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com