
पुणे : उत्पादन, इंजिनिअरिंग, माहिती तंत्रज्ञान (आयटी), हायब्रीड पद्धतीने काम या क्षेत्राची सातत्याने वाढ होत आहे, त्यामुळे पुण्यात व्यावसायिक जागांची मागणी वाढतच आहे. २०२५च्या पहिल्या सहामाहीत (जानेवारी ते जून) आतापर्यंतच्या सर्वाधिक म्हणजेच ६.८ दशलक्ष चौरस फूट जागेचा भाडेतत्वावरील करार (ग्रॉस लीझिंग व्हॉल्युम-जीएलव्ही) झाले आहेत. मागील वर्षीच्या कालावधीच्या तुलनेत त्यात ६७ टक्के आणि २०२४ च्या दुसऱ्या सहामाहीच्या तुलनेत ५४ टक्के वाढ झाली आहे.