

Pune Sewage Pipeline Repairs Cost 40 Crore in Four Years Yet Leakage Continues and Mula Mutha River Remains Polluted
sakal
-ब्रिजमोहन पाटील
पुणे: सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाला (एसटीपी) जोडणाऱ्या मोठ्या व्यासाच्या मलवाहिन्यांची (ट्रंक लाईन) स्वच्छता व देखभाल-दुरुस्तीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढल्या जातात. तरीही नाल्यांमधून रोज कोट्यवधी लिटर सांडपाणी वाहत असल्याने या मलवाहिन्यांच्या कामांवरच प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाकडून काटेकोर लक्ष ठेवले जात नसल्याने प्रत्यक्ष कामे न करता बिले लाटण्याचे उद्योग वर्षानुवर्षे सुरू आहेत. त्यामुळे एसटीपीला पुरेसे सांडपाणी न मिळाल्याने मुळा-मुठा नदीची ‘गटारगंगा’ झाली आहे.