
पुणे : मलवाहिनी तुंबत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर
उंड्री: काळेपडळ ड्रिम्स आकृती ते रेल्वे गेटदरम्यान मलवाहिनी जुनी आणि कमी व्यासाची असल्याने वारंवार तुंबत आहे. त्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालिका प्रशासनाने मोठ्या व्यासाची मलवाहिनी टाकून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रा. शोभा लगड आणि संदीप राऊत यांनी निवेदनाद्वारे हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील महापालिका सहायक आयुक्त प्रसाद काटकर यांच्याकडे केली.
प्रा. शोभा लगड म्हणाल्या की, मागिल १५ वर्षांपूर्वी येथे मलवाहिनी टाकली असून, त्यावेळी लोकवस्ती कमी होती. कमी व्यासाची मलवाहिनी असल्याने पावसाचे आणि सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होतो. दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर आणि नागरिकांच्या घरात शिरते. पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. आता लोकवस्ती वाढली असल्याने कमी व्यासाची जुनी मलवाहिनी काढून तेथे मोठ्या आकाराची मलवाहिनी टाकून सांडपाण्याचा प्रश्न कायमचा पावसाळ्यापूर्वी सोडवावा, असे निवेदनामध्ये म्हटले आहे.
दरम्यान, महापालिका सहायक आयुक्त प्रसाद काटकर म्हणाले की, पावळापूर्व कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मलवाहिनी आणि सांडपाण्याचा प्रश्नही उपलब्ध बजेटनुसार मार्गी लावला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
Web Title: Pune Sewers Health Problem Citizens Serious
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..