Pune Sextortion News : पुण्यात तिशीतल्या तरूणाचं सेक्सटॉर्शन; आत्महत्या करेन म्हणत उकळले पैसे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune sextortion case man was cheated of five lakh rupees by a young woman

Pune Sextortion : पुण्यात तिशीतल्या तरूणाचं सेक्सटॉर्शन; आत्महत्या करेन म्हणत उकळले पैसे

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा सेक्सटॉर्शन (sextortion) चा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणीकडून एका तरुणाची ५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या संबंधीत तरुणाला ऑनलाईन ॲप वरुन झालेली ओळख चांगलीच पडली महागात आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय तरुणाने पोलिसात फिर्याद दिली आहे.

दरम्यान या प्रकरणी नवी मुंबईतील कळंबोळी येथील राहणाऱ्या प्रीती देशपांडे उर्फ प्रीती गहांदुळे (३०) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जून २०२१ पासून सुरू होता प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि प्रीती देशपांडे उर्फ प्रीती गहांदुळे यांची ओळख "स्टार मेकर" या मोबाईल ॲप वरुन झाली होती. प्रीतीने ने फिर्यादीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. या नंतर तिने फिर्यादीशी शारिरिक संबंध प्रस्थापित करून त्याची फसवणूक केली.

हेही वाचा - प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

हेही वाचा: Video : अमृता फडणवीसांपुढे माधुरीही फिकी! नवीन डान्स व्हिडीओ एकदा पाहाच

या पुढे जाऊन प्रीतीने या तरुणाकडे वेळो-वेळी ५ लाख रुपयांची मागणी केली. तसेच त्या तरुणाला तुझ्या घरी आणि ऑफिस मध्ये हे सगळं प्रकरण सांगून बदनामी करेल अशी धमकी देखील दिली. पैसे नाही दिले तर आत्महत्या करेल असे देखील वारंवार धमकावले. या नंतर फिर्यादीने या जाचाला कंटाळून पोलिसात धाव घेतली.

हेही वाचा: Urfi Javed Controversy: "गुळ-खोबरं देऊन आमंत्रण दिलं नव्हतं", उर्फी प्रकरणी चित्रा वाघ यांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर

भारतीय दंडात्मक कलम ३८४, ३८५, ४१७, ५०० आणि ५०६ या अंतर्गत येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा: गुवाहाटीला न जाता सुरतहून परतलेल्या ठाकरे गटातील आमदाराचा बदला? एसीबीने पाठवली नोटीस

टॅग्स :Pune News