शरद पवार-देवेंद्र फडणवीस पुण्यात 'एकाच' व्यासपीठावर ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad pawar -Devendra fadnvis -Sushil kumar Shinde

शरद पवार - देवेंद्र फडणवीस पुण्यात 'एकाच' व्यासपीठावर !

पुणे : राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि भाजपचे नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते बऱ्याच महिन्यांनी 'सकाळ' च्या व्यासपीठावर रविवारी एकत्र आले.

पवार यांनी कोल्हापूरची सभा शनिवारी गाजविली तर फडणवीस मुंबईतून शनिवारी रात्री पुण्यात आले. रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले.

या पार्श्वभूमीवर 'सकाळ'ने पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात राज्यातील उद्योग-व्यावसायिकांचा 'ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र' या कार्यक्रमातंर्गत गौरव केला. पवार, फडणवीस यांच्यासह माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सकाळ समूहाचे अध्यक्ष प्रताप पवार हे ही यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमस्थळी शिंदे, पवार यांच्यानंतर फडणवीस पोचले. उपस्थितांना अभिवादन करून फडणवीस पवार यांच्याशेजारी स्थानापन्न झाले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार केंद्र सरकार बरखास्त करणार, अशी राज्यात चर्चा सुरू असतानाच योगायोगाने पवार आणि फडणवीस सकाळच्या कार्यक्रमात एकत्र आले.

Web Title: Pune Sharad Pawar Devendra Fadnavis On Same Platform Criticis Mahavikas Aghadi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top