शरद पवार पुण्यातील वारजे इथं 45 मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाच्या उद्घाटन कार्यक्रमाला आले होते. त्यानंतर ते सीरम इन्स्टिट्यूटमध्ये गेले. तिथं घटनास्थळाचा आणि घटनेची माहिती पोलिसांकडून घेतली. सीरममधील आगीच्या घटनेवर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
पुणे - कोरोनाची लस तयार निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या एका इमारतीला गुरुवारी भीषण आग लागली होती. या आगीमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली होती. आता माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन आढावा घेतला.
शरद पवार पुण्यातील वारजे इथं 45 मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाच्या उद्घाटन कार्यक्रमाला आले होते. त्यानंतर ते सीरम इन्स्टिट्यूटमध्ये गेले. तिथं घटनास्थळाचा आणि घटनेची माहिती पोलिसांकडून घेतली. सीरममधील आगीच्या घटनेवर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
आणखी वाचा - छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा इतिहास संकुचित ठेवणार का?
सीरम इन्स्टिट्यूटच्या मांजरी य़ेथील प्लांटमध्ये गुरुवारी भीषण आग लागली होती. या आगीमध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर या आगीच्या घटनेची चौकशी व्हावी अशीही मागणी करण्यात आली. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, आगीच्या घटनेचा अहवाल आल्यानंतरच याबाबत बोलता येईल. आताच कोणताही निष्कर्ष काढणं योग्य होणार नाही.
सीरमचे सीईओ आदर पूनावाला यांनी सांगितलं की, ''आगीत इमारतीच्या तीन-चार मजल्यांवरचे साहित्य जळाले आहे. यामध्ये जवळपास एक हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जगात इतर देशांना पुरवण्यात येणाऱ्या रोटा आणि बीसीजी लशींच्या साहित्याचं नुकसान झाल्याचंही आदर पूनावाला म्हणाले.''