Pune : शिंदेवाडीत बसला अचानक आग

सर्व प्रवासी भिवंडी येथील पाया गावातून दर्शनासाठी आले होते
fiar
fiarsakal

घोडेगाव : श्री क्षेत्र भिमाशंकर येथे दर्शनासाठी आलेल्या 27 भाविकांना घेऊन जाणाऱ्या मिनीबसला पहाटे 6.30 वाजता मंचर भिमाशंकर रस्त्यावर शिंदेवाडी (ता. आंबेगाव) येथे अचानक आग लागली. सर्व प्रवासी सुरक्षित बाहेर पडल्याने त्यांना कोणतीही इजा झाली नाही. घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी पोलीस व स्थानिक ग्रामस्थाच्या मदतीने प्रवासी सुरक्षित बाहेर काढले. बस विझविण्याचा प्रयत्न केला परंतु आग विझू शकली नाही. हे सर्व प्रवासी भिवंडी येथील पाया गावातून दर्शनासाठी आले होते.

याबाबत घोडेगाव पोलीसांनी दिलेली माहिती अशी बाबू बसप्पा सुरपुर (वय 30 वर्ष, रा. कल्याण डोंबवली) हा भिवंडी येथील पाया गावातील 27 प्रवासी घेऊन मिनीबस (क्र. एमएच 05 डी. के. 9699) भिमाशंकर येथे देवदर्शनाकरिता निघाले होते. आज सकाळी साडेसहा वाजता घोडेगाव हद्दीत घोडेगाव भिमाशंकर रोडवर शिंदेवाडी येथे मिनीबसने अचानक पेट घेतला. बसने पेट घेताच बसमधील सर्व प्रवासी खाली उतरले.

त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने व त्यांच्या टीमने घटना स्थळी येऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. बस पूर्ण खाक झाली होती. बसमधील 27 प्रवाशी सुखरूप आहेत. त्यामध्ये 23 महिला व 3 पुरूष आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com